बेंगळूर
चीनबरोबरच्या संबंधातील कटुतेमुळे आता भारतीय कंपन्या आत्मनिर्भरतेवर जोर देत आहेत. किचन अप्लायन्सेसच्या क्षेत्रात नावाजलेल्या टीटीके प्रेस्टीजनेही नुकताच सुखावणारा निर्णय घेतला. चीनमधून यापुढे कोणत्याही वस्तू आयात केल्या जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. किमान यापुढे तरी चीनमधून उत्पादनांसाठी लागणाऱया वस्तू आयात केल्या जाणार नसल्याचे चेअरमन टी. टी. जगन्नाथ यांनी म्हटलंय. स्थानिक तत्वावर उत्पादनावर सर्वदृष्टय़ा प्रयत्न करण्यात येईल. गरज लागलीच तर व्हीएतनाम वा तुर्कीतून आवश्यक साहित्य मागवण्यात येईल, असंही जगन्नाथ यांनी स्पष्ट केले. चीनच्या वस्तुंसंदर्भात बहिष्काराच्या आवाहनानुसार प्रेस्टीजने असा निर्णय घेत आपला प्रेस्टीज खऱया अर्थाने राखलाय.









