मुंबई :
कोरोनामुळे हॉटेल, रेस्टॉरंट व कॅफे बंद असल्याने दूध आणि दुग्धोत्पादनांच्या मागणीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक दूध उत्पादक उद्योगाने अतिरीक्त दूधाची पावडर व लोणी करण्यावर भर दिला आहे. दरम्यान सरकारने नुकताच 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा विचार चालवला असून यास दूध उद्योगाने तीव्र विरोध दर्शवला आहे. आयातीमुळे देशातील शेतकऱयांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप दूध उद्योजकांनी केला आहे. दूधाच्या वापरात कपात झाली असून उलट पुरवठय़ात 15 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शिल्लक दूधाचा वापर पावडर व लोणी करण्यासाठी केला जात आहे. असे असताना आता पावडरची आयात केल्यास येथील शेतकऱयांचे नुकसान होणार आहे.









