नवी दिल्ली
देशातील दिग्गज समूह टाटाच्या दोन समभागांनी मागील वर्षभरात जवळपास 2,400 टक्केपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. यामध्ये दूरसंचार सर्व्हिस प्रोव्हायडर टाटा टेलिसर्व्हिस महाराष्ट्र(टीटीएमएल) आणि वाहनांसाठी सुट्टेपार्ट बनविणारी कंपनी ऑटोमेटिव्ह स्टॅपिंग्स ऍण्ड ऍसेंबल्सचा (एएसएल) समावेश आहे. या कालावधीत बीएसई सेन्सेक्समध्ये 23 टक्के तेजी प्राप्त झाली आहे. मागील एक वर्षात टीटीएमलचे समभाग 2,778 टक्के तेजी आली, तर याचदरम्यान एएसएएलचा समभाग बीएसईवर 2,476 टक्के वधारला आहे. म्हणजे या दोन समभागानी आपला सर्वोच्च टप्पा प्राप्त केला आहे.
एएसएल आणणार नवा प्रकल्प
याच दरम्यान एएसएएलने मागील महिन्यात एक नवा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. हा प्रकल्प पुण्यात सुरु करण्यात येणार असून कंपनीमध्ये टाटा ऍटोकॉम्प सिस्टमची 75 टक्के हिस्सेदारी आहे.









