वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍपलचे बाजारमूल्य 3 ट्रिलियन डॉलरच्या घरात पोहोचले आहे. सदरचे बाजारमूल्य हे भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. वर्ष 2022 ज्या पहिल्या सत्रात सोमवारी ऍपलच्या बाजारमूल्याने इतिहासात प्रथमच 3 ट्रिलियन डॉलर म्हणजे 3 लाख कोटी डॉलर (जवळपास 224 लाख कोटी रुपये) चा टप्पा प्राप्त केला आहे.
वर्षच्या पहिल्या दिवशी सिलिकॉन व्हॅलीमध्ये ऍपल कंपनीच्या समभागाने 182.88 डॉलरवर पोहचून इंट्राडेमध्ये विक्रम नोंदवला आहे. ज्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य 3 ट्रिलियनच्या वर गेले असल्याची माहिती आहे. सदरचा समभाग 2.5 टक्क्यांनी वधारुन 182.01 डॉलरवर बंद झाला आहे.
ऑगस्ट 2018 मध्ये 1 ट्रिलियन डॉलरची कामगिरी
ऍपलच्या बाजारमूल्याचा डंका हा खूप अगोदरपासून राहिला आहे. ज्यामध्ये ऑगस्ट 2018 मध्ये ऍपल ट्रिलियन डॉलर मूल्याची पहिली अमेरिकन कंपनी झाली आहे. सदरच्या कामगिरीला जवळपास 42 वर्षांचा कालावधी लागला आहे. या पुढील टप्पा प्राप्त करण्यासाठी कंपनीला 16 महिने व 15 दिवस इतका कालावधी लागला असल्याची माहिती आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये समावेश
टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट चालू वर्षात 3 ट्रिलियन डॉलरच्या क्लबमध्ये समावेश करण्याचे संकेत आहेत. जानेवारी 2007 मध्ये जेव्हा ऍपलने आयफोन सादर केला होता, तेव्हा कंपनीची किमत ही 73.4 अब्ज डॉलर होती.
भारत-ब्रिटनच्या जीडीपेपेक्षा अधिक मूल्य
ऍपलच्या या कामगिरीने भारत आणि ब्रिटन यांच्या जीडीपीपेक्षा अधिकची कामगिरी केली आहे. यामुळे ऍपलचा प्रवास हा मजबूत होताना दिसतो आहे.
आयफोनची विक्री
वर्षभरात आयफोनची विक्री 192 अब्ज डॉलरची राहिली होती. जी एक वर्षाच्या तुलनेत जवळपास 40 टक्के जादा राहिली आहे.









