प्रतिनिधी/ पणजी
ज्येष्ठ साहित्यिक, प्रागतिक विचारसणीचे चळवळे कार्यकर्ते आणि नुकताच भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले दामोदर उर्फ भाई मावजो यांची खास मुलाखत पणजी दूरदर्शनच्या साहित्य दर्पण या कार्यक्रमात आज रविवार 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा. 5 मिनिटांनी प्रसारित करण्यात येणार आहे.
पत्रकार तथा मुलाखतकार राजू भिकारो नाईक आणि डॉ. रमिता गुरव यांनी ही मुलाखत घेतली आहे. दूरदर्शनचे निर्माते राजेंद्र फडते यांनी निर्मिती केली आहे. मुलाखतीत मावजो यांच्या समग्र साहित्यावर संवाद साधण्याबरोबरच त्यांची अनेक विषयांवरील सुस्पष्ट मतेही व्यक्त झालेली आहेत. रवींद्र केळेकर यांच्यानंतर गोव्याला दुसरे ज्ञानपीठ मिळवून देणाऱया मावजो यांनी केळेकर यांच्याप्रमाणाचे ‘रायटर शुल्ड बी फायटर’ या मताचा पुनरुच्चार केले आहे.









