नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जे. पी. नड्डा यांचे ट्विटर अकाउंट रविवारी हॅक करण्यात आले. हॅकर्सनी रविवारी सकाळी त्याचे अकाऊंटवर ताबा मिळवत त्यांच्या प्रोफाईलचे नावही बदलले होते. तसेच रशिया-युक्रेनशी संबंधित एक ट्विट केले आणि काहीवेळाने ते डिलीटही करण्यात आले. नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘मी रशियाच्या लोकांसोबत आहे. आता क्रिप्टोकरन्सीचे दान स्वीकार करा’ असे ट्विट करत लिंक शेअर करण्यात आल्या होत्या. परंतु, याच ट्विटमध्ये खाली माझा युपेनच्या लोकांना पाठिंबा असून त्यांच्यासाठी देखील क्रिप्टोकरन्सीचे दान स्वीकार करा, असे हिंदीमध्येही लिहिले होते. सदर दोन्ही ट्विट हॅकर्सनी केली असल्याचे समोर आले आहे.









