प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात सोमवारी कोरोना रूग्णांच्या संख्येत काहीशी घट दिसून आल़े मागील 24 तासामध्ये जिह्यात 310 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े दर सोमवारी जिह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत घट दिसून येत़े त्यामुळे हा खऱया अर्थाने दिलासा आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 24 तासात आरटीपीसीआर टेस्टमध्ये 190 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये केवळ 120 से एकूण 310 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 120 दापोली 14, खेड 11, गुहागर 06, चिपळूण 76, संगमेश्वर 30, मंगणगड 00, लांजा 12 व राजापूर 41 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 27 हजार 271 इतकी झाली आह़े
तर जिह्यामध्ये नव्याने 11 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी यामध्ये मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 3, चिपळूण 4 , गुहागर 1, लांजा 1, दापोली 1 व संगमेश्वर येथील 1 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा जिह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची तालुकानिहाय आकडेवारी नुसार रत्नागिरी 209, खेड 91 गुहागर 34, दापोली 76, चिपळूण 168, संगमेश्वर 118, लांजा 50, राजापूर 61, मंडणगड 8 जिह्यातील एकूण मृतांची संख्या 815 इतकी पोहचली असून मृत्यूदर 2.98 इतका आह़े









