प्रतिनिधी /बेळगाव
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा रविवारी बेळगावसह संपूर्ण देशभर पार पडली. बेळगाव जिल्हय़ात 8 हजार 500 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. रविवारी बेळगाव शहरासह जिल्हय़ातील 22 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत बेळगाव शहरातील इंजिनियरिंग कॉलेज व सीबीएससी स्कूलमध्ये परीक्षा पार पडली. यामुळे शहरात रविवारी सर्वत्र विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. कोरोनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. देशभरात एकूण 13 लाख 66 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना डेसकोडचे निर्बंध घालण्यात आले होते. परीक्षेपूर्वी वर्ग खोल्यांमध्ये सॅनिटायझरची फवारणी केली जात होती.









