910 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू : कोरोनाचे नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारी बेळगाव जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 2100 जणांनी कोरोनावर मात केली असून 910 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर जिल्हय़ात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा आकडा 551 वर पोहोचला आहे.
सोमवारी 910 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकूण बाधितांची संख्या 65,885 वर पोहोचली असून गेल्या 24 तासात 2100 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 50,084 वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत चालली असून अद्याप 15 हजार 250 सक्रिय रुग्ण आहेत.
सोमवारी सांबरा एटीएसमधील आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुचंडी, वाघवडे, कंग्राळी बी.के., मारिहाळ, बाकनूर, बेकिनकेरे, मुतगा, गोजगा, हिंडलगा, सांबरा, कंग्राळी खुर्द, हलगीमर्डी, देसूर, मच्छे, सावगांव, बेनकनहळ्ळी, येळ्ळूर, सुळेभावी, सुळगा, म्हाळेनट्टी, बसुर्ते, अष्टे, अंजनेयनगर, आझमनगर, बसव कॉलनी, बुडा कॉलनी, चव्हाट गल्ली, गांधीनगर, काकतीवेस रोड, गणपत गल्ली, जुने बेळगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
वंटमुरी कॉलनी, वीरभद्रनगर, रामतीर्थनगर, ज्योतीनगर, महांतेशनगर, खासबाग, महात्मा फुले रोड, विनायकनगर, टिळकवाडी, उद्यमबाग, शहापूर, चिदंबरनगर, रामतीर्थनगर-वड्डरवाडी, राणी चन्नम्मानगर, शाहूनगर, सदाशिवनगर, वडगाव, पार्वतीनगर, शांतीनगर, शिवबसवनगर, वैभवनगर, मुत्यानट्टी परिसरात नवे रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी 30 मेपर्यंतचा जिल्हय़ातील अहवाल जारी केला असून 17 मार्च 2021 ते 30 मे पर्यंत 37 हजार 898 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. त्यापैकी 21 हजार 123 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 438 जण वेगवेगळय़ा कोविड केअर सेंटरमधून उपचार घेत आहेत. तर या काळात 194 जण दगावले आहेत. गेल्या दहा दिवसात पॉझिटिव्ह दर 12 टक्के असून बरे होणाऱयांची टक्केवारी मात्र 73.85 इतकी आहे. मृत्यूचे प्रमाण 0.82 टक्के आहे. सरकारी व वेगवेगळय़ा खासगी इस्पितळांमध्ये 2 हजार 269 जण उपचार घेत आहेत. तर वेगवेगळय़ा कोविड सेंटरमध्ये 1202 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. कोविड सेंटरमध्ये उपचार घेवून 764 जण बरे झाले आहेत. सध्या 438 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. 1217 बेड उपलब्ध असून जिल्हय़ात ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा साठा असल्याचे त्यांनी सांगितले.