अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 19 डिसेंबर 2021, सकाळी 11.30
● ओमिक्रॉन बधितांची तब्बेत ठणठणीत
● शनिवारी दिवसभरात 2717 जणांचे स्वॅब तपासणी
● सातारा तालुक्यात सर्वात जास्त बाधित संख्या
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोना बाधित वाढ स्थिर आहे. नव्याने रविवारी मध्यरात्री 12 वाजता जाहीर झालेल्या अहवालात 20 जण बाधित आढळून आले आहेत. फलटणमधील ते तिन्ही ओमिक्रॉनबाधित ठणठणीत विलगीकरणात आहेत. शनिवारी दिवसभरात 2717 जणांचे स्वाब तपासणी करण्यात आले. सातारा तालुका सगळ्यात जास्त बधितांमध्ये असून नव्याने बाधित वाढ दहाच्या खाली आहे.
ओमिक्रॉनबाधित ठणठणीत
कसलाही प्रवास करायचा असल्यास त्या व्यक्तीला डोस व कोविड चाचणी ही बंधनकारक असते. तेच नियम पाळून फलटण येथील ते चौघे आले असण्याची शक्यता आहे. तरीही त्यातील तिघांचे अहवाल ओमिक्रॉनबाधित आढळून आले. त्यांची तब्येत ठणठणीत असून त्यांच्या निकटवर्तीयांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉनमुळे कोणीही घाबरून जाऊ नये, परंतु परदेशातुन आलेल्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.
सातारा तालुका अग्रेसर
नव्याने होणारी कोरोना बाधित वाढ रोखली गेली आहे. जिल्ह्यात 11 तालुक्यातील सातारा तालुक्यातील बाधित वाढ ही अजून ही पुढे आहे. मात्र दहाच्या खाली आहे.जावली, कोरेगाव, वाई, कराड हे तालुके गेल्या वीस दिवसांमध्ये निरंक बाधित आहेत. कोणीही बाधित आढळू नये, यासाठी सर्वाचा प्रयत्न सुरू आहे.
रविवारी
नमुने-2717
बाधित-20
रविवारपर्यत
नमुने-23,49,632
बाधित-2,52,279
मृत्यू-6,487
मुक्त-2,44,791









