प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर येथील राजश्री शाहू गव्हर्मेंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी आठ वाजता महाराष्ट्र हायस्कूल पद्माराजे आणि मराठा बोर्डिंग येथील 52 केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत बाराशे पन्नास मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन, मतदान केंद्राबाहेर स्वागत करण्यासाठी तिन्ही पॅनलचे उमेदवार उपस्थित आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.
बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदाची निवडणूक चुरशीने होत आहे. सत्तारूढ गटाचे सर्वेसर्वा रवींद्र पंदारे यांचे नेतृत्व 70 पॅनलच्या विरोधात माजी चेअरमन प्रकाश पाटील आणि बाळासाहेब घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलने तगडे आव्हान उभे केले आहे. तर युवक सभासदांनी छत्रपती शिवाजी महाराजयांच्या नावाने युवक आघाडी होऊन निवडणूक लढवत आहेत.अशा प्रकारे तिरंगी लढती असल्यामुळे चुरस निर्माण झालेली आहे.
Previous Articleइराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ रॉकेट हल्ला
Next Article जिल्ह्यात नव्याने 20 बाधित









