शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांची माहिती
प्रतिनिधी/ .रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालाच्या प्रसुतीपश्चात विभाग 2 मध्ये गुरूवारी पहाटे 5ः30 च्या सुमारास गिझरचा अचानक स्फोट झाल़ा या घटनेने बाथरुमधून धुराचे प्रचंड लोण पसरल्याने कर्मचारी व रूग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव झाल़ी बालकांसह बाळींतीना बाहेर काढण्यात आले असे असले तरी अशी घटना घडलीच नाही, अशी रंगसफेदी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
जिल्हा रूग्णालयातील प्रत्यक्षदर्शीच्या मते गुरूवारी सकाळी 5 च्या सुमारास महिला आंघोळीस बाथरूमध्ये गेली असता अचानक गिझरचा स्फोट झाल़ा धुराच्या लोण पसरल्याने आतिल कर्मचाऱयानीतातडीने बाळांना बाहेर काढण्यास सुरूवात केल़ी या धुरामुळे महिला व नवजात बालकांना धुराचा त्रास होवू लागला होत़ा तेथे उपस्थित नातेवाईक व अन्य महिलांनी माता व बालकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास प्रयत्न सुरूवात केल़ी रूग्णांच्या नातेवाईकांनी धावाधाव करत महिलांना व नवजात बाळांना सुरक्षित बाहेर काढल़े या ठिकाणी शस्त्रक्रीया झालेल्या महिला असल्याने आगीमुळे मोठा अनर्थ होण्याच्या शक्यतेने अनेकांनी तातडीने हालचाली केल्या होत्या. मात्र या घटनेत कोणतीही मोठी हानी वा अनर्थ झाला नाही. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले आह़े
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अशी घटनाच घडल्याच्या इन्कारामुळे काही काळ तेथे झालेली धावपळ व प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली घटना नेमकी काय होती या समोरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचबरोबर त्या वेळचे सीसीटिव्ही फुटेज पाहण्यात यावे, असेही सांगितले जात आहे.









