पेंडॉल, इलेक्ट्रीकल असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे आम्ही पेंडॉल, इलेक्ट्रीकल आणि साऊंड कंत्राटदार अडचणीत आलो आहे. मागील वषीही याचवेळेला आम्हाला फटका बसला होता. नेमके लग्नाच्या हंगामामध्येच हा प्रकार घडला आहे. तेंव्हा सरकारने लग्नासाठी केवळ 25 आणि 50 व्यक्तींनाच मुभा हा नियम रद्द करुन त्यामध्ये वाढ करावी आणि आम्हाला मंडप घालण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पेंडॉल आणि इलेक्ट्रीकल डोकेरेटर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
पेंडॉल, इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य हे अत्यंत महागाचे असते. त्यामुळे यामध्ये आम्हाला मोठय़ा रकमेची गुंतवणूक करावी लागते. लाखो रुपये प्रत्येकाला गुंतवावे लागतात. मात्र अशा प्रकारे कामच मिळाले नाही तर ती गुंतवणूक आमच्या अंगलट आली आहे. मागील वषी कोरोनामुळे आम्हाला व्यवसायच करण्यास मुभाच मिळाली नाही. त्यानंतर सुरुवातीला आता काही प्रमाणात व्यवसाय सुरू झाला म्हणून आम्ही पुन्हा गुंतवणूक केली. मात्र आता या कठोर नियमांमुळे आमच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
या व्यवसायावर अनेक कुटुंब अवलंबून आहेत. सरकारने जे कोरोनाचे नियम घातले आहेत ते पाळून आम्ही काम करण्यास तयार आहेत. मात्र केवळ विवाहासाठी अशा प्रकारे निर्बंध घालून आमच्या व्यवसायावरच गदा आणण्याचा प्रकार करण्यात आला आहे. तो चुकीचा आहे. तेंव्हा त्यामध्ये वाढ करून आम्हाला व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. दरम्यान अनेकांकडून आता आम्ही मंडप घालण्यासाठी आगाऊ रक्कम घेतली आहे ती देखील आम्हाला परत द्यावी लागणार आहे. तेंव्हा याचा कोठे तरी गांभीर्याने विचार करा आणि आम्हालाही जीवन जगण्यास मदत करा, अशी भावनिक विनंती असोसिएनतर्फे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नारायण चौगुले, सेपेटरी परशराम सांळुखे, बाळू जोशी, विजय काकतीकर, भाऊ मन्नोळकर, दामू रतन, मल्लिकार्जुन, भगवत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कंत्राटदार आणि कामगार उपस्थित होते.









