बेंगळूर
प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत जनऔषधी केंद्रांची संख्या 800 पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री सदानंदगौडा यांनी दिली. राज्यात एकूण 788 प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे आहेत. या ठिकाणी परवडणाऱया दराने औषधविक्री केली जाते. मार्च अखेरपर्यंत अशा औषध केंद्रांद्वारे 125 कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. 2020 या वर्षात देशातील 7,064 जनऔषधी केंद्रांद्वारे 484 कोटींची औषधविक्री करण्यात आली आहे.









