प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत सोन्याच्या साखळ्य़ा चोरणाऱया टोळीतील संशयिताला शहर पोलिसांनी अटक केल़ी बाळू तुळशीराम जाधव (28, ऱा बीड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आह़े सिंधुदुर्ग येथून चोरटय़ाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्याची माहिती प्राप्त झाली आह़े
शहरातील मारूती मंदिर येथे 27 ऑगस्ट रोजी सकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली होत़ी राणे यांचे मारूती मंदिर परिसरात आगमन होताच कार्यकत्यांनी जल्लोष केल़ा राणे यांना भेटण्यासाठी कार्यकत्यांची झुंबड उडल़ी याच गर्दीचा फायदा उठवून चोरटय़ांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन लंपास करण्यास सुरूवात केल़ी राणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे गेले असता कार्यकर्त्यांना आपल्या सोन्याच्या चेन चोरीला गेल्याचे लक्षात आल़े या प्रकरणी शहर पोलिसांकडून अज्ञात चोरटय़ाविरूद्ध गुन्हा दाखल केला होत़ा चोरीप्रकरणी शहर पोलिसांकडून मारूती मंदिर परिसरातील सीसीटीव्ही पॅमेरे तपासून पाहिल़े त्यानुसार काहीजणांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल़े राणे यांची सभा सिंधुदुर्ग जिह्यात मार्गस्थ होणार असल्याने पोलिसांकडून या चोरटय़ांचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आल़ी यावेळी सिंधुदुर्गात संशयित पोलिसांना आढळल़ा त्यानुसार त्याला ताब्यात घेवून रत्नागिरी येथे आणण्यात आल़े दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर संशयित चोरटय़ाचे अन्य साथीदार फरार झाल्याचे सांगण्यात आले.









