दोन्ही संघांकडून 422 धावांची आतषबाजी, डय़ू प्लेसिस, दीपक चहर विजयाचे शिल्पकार
मुंबई / वृत्तसंस्था
आंद्रे रसेल (22 चेंडूत 54) व पॅट कमिन्स (34 चेंडूत नाबाद 66) यांच्या झंझावाती फलंदाजीनंतरही चेन्नई सुपरकिंग्सने बुधवारी दुसऱया साखळी सामन्यात केकेआरवर 18 धावांनी सनसनाटी विजय संपादन केला. चेन्नईने प्रारंभी फॅफ डय़ू प्लेसिसच्या नाबाद 95 धावांच्या खेळीमुळे 3 बाद 220 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात केकेआर संघ 19.1 षटकात सर्वबाद 202 धावांपर्यंत पोहोचू शकला. चेन्नईतर्फे दीपक चहरने 29 धावात 4 बळी घेतले.
शुभमन गिल (0), नितीश राणा (9), राहुल त्रिपाठी (8), मॉर्गन (7), सुनील नरेन (4) हे आघाडीचे 5 फलंदाज अवघ्या 31 धावात बाद झाल्यानंतर मुळात केकेआरला विजयाची अपेक्षा नव्हतीच. पण, दिनेश कार्तिक (24 चेंडूत 40) व रसेल, कमिन्स यांच्या फलंदाजीमुळे सामन्यात अचानक चुरस निर्माण झाली. निर्णायक क्षणी रसेल बाद झाल्यानंतर कार्तिकने फटकेबाजी सुरु ठेवली व कमिन्स तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढला. पण, अंतिमतः हा दिवसच चेन्नईचा होता आणि त्यांनी 18 धावांसह अंतिमतः बाजी मारली.

केकेआर ः शुभमन गिल झे. एन्गिडी, गो. चहर 0 (1 चेंडू), नितीश राणा झे. धोनी, गो. चहर 9 (12 चेंडूत 2 चौकार), राहुल त्रिपाठी झे. धोनी, गो. एन्गिडी 8 (9 चेंडूत 1 चौकार), इयॉन मॉर्गन झे. धोनी, गो. चहर 7 (7 चेंडूत 1 चौकार), सुनील नरेन झे. जडेजा, गो. चहर 4 (3 चेंडूत 1 चौकार), दिनेश कार्तिक पायचीत गो. एन्गिडी 40 (24 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), आंद्रे रसेल त्रि. गो. करण 54 (22 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), पॅट कमिन्स नाबाद 66 (34 चेंडूत 4 चौकार, 6 षटकार), कमलेश नागरकोटी झे. प्लेसिस, गो. एन्गिडी 0 (2 चेंडू), वरुण चक्रवर्ती धावचीत (चहर-ठाकुर) 0 (1 चेंडू). अवांतर 14. एकूण 19.1 षटकात सर्वबाद 202.
गडी बाद होण्याचा क्रम
1-1 (शुभमन, 0.4), 2-17 (नितीश राणा, 2.5), 3-27 (मॉर्गन, 4.3), 4-31 (सुनील नरेन, 4.6), 5-31 (त्रिपाठी, 5.2), 6-112 (रसेल, 11.2), 7-146 (दिनेश कार्तिक, 14.6), 8-176 (कमलेश, 16.2), 9-200 (वरुण, 18.3), 10-202 (प्रसिद्ध कृष्णा, 19.1).
गोलंदाजी दीपक चहर 4-0-29-4, सॅम करण 4-0-58-1, लुंगी एन्गिडी 4-0-28-3, रविंद्र जडेजा 4-0-33-0, शार्दुल ठाकुर 3.1-0-48-









