प्रतिनिधी /पणजी
गोमंतक भंडारी समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीने मिनेझिस सभागृह पणजी येथे गोमंतक समाजातील ज्ञाती भगिनी रिचा लवू गोवेकर हिचा गोमंतकातील पहिल्या महिला कर्मशियल पायलट झाल्यामुळे आमदार जयेश साळगांवकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्री गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष देवानंद नाईक, महासचिव फक्रू वामन पणजीकर, खजिनदार जोगुसो नाईक, सचिव कृष्णकांत गोवेकर, सचिव अमर नाईक शिरोडकर, कार्यकारिणी सदस्य महानंद अस्नोडकर, वासुदेव विर्डीकर, कार्यकारिणी सल्लागार प्रकाश कळंगुटकर, महिला अध्यक्षा शुभांगी वायंगणकर, सचिव संध्या पालयेकर, युवा सचिव मशाल आडपईकर, म्युनिसिपाल ऍडमिनेशनचे संचालक गुरुदास पिळर्णकर उपस्थित होते. सदर समारंभाला रिचा गोवेकर हिचे आई – वडिल तसेच गोमंतक भंडारी समाजाचे तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य व इतर ज्ञाती बांधव उपस्थित होते.
आमदार जयेश साळगावकर यांनी रिचा गोवेकर हिचे कौतुक करुन पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. रिचाने आपल्या भाषणात गोमंतक भंडारी समाजाच्या कार्यकारिणी समितीचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमंतक भंडारी समाजाचे महासचिव फक्रू पणजीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. केंद्रीय समितीचे सदस्य महानंद अस्नोडकर यांनी कार्यक्रमास हजर असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.









