प्रतिनिधी /पणजी
गोमंतक बहुजन महासंघाची बैठक पणजीतील गोमंतक साहित्यसेवक मंडळाच्या सभागृहात 22 डिसेंबर रोजी महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे यांच्या अध्यक्षतेखली झाली. या बैठकीत उपेंद्र चंदू गावकर यांची महासंघाच्या कार्यकारी अध्यक्ष (संघटन) पदी निवड करण्यात आली.
गोमंतक बहुजन महसंघाचे कार्य संपूर्ण गोव्यात विस्तारण्यासाठी गांवकर यांनी पुढाकार घ्यावा, असे अनिल होबळे यांनी सांगितले.
गोमंतक बहुजन महासंघाचा सांस्कृतिक मेळावा जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे महासचिव भालचंद उसगावकर यांनी सांगितले.









