प्रतिनिधी /पणजी
डॉ. सर्वानंद तुकाराम सावंत देसाई यांच्या लिखाणातून साकारलेले कोकणी बाल साहित्य ’सात पावलां गिन्यानाकडे न’ हे नाटय़रूपी संवादांनी नटलेल्या व क्रांती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कोंकणी पुस्तकाचे लोकार्पण कुडचडे येथील रवींद्र भवनात करण्यात आले.
सावर्डेचे सरपंच संदीप प्रभू पाऊसकर व कुडचडे काकोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष विश्वास सावंत देसाई ह्यांच्या हस्ते रवींद्र भवनाच्या कार्यकरणी सदस्यांच्या उपस्थितित ह्या पुस्तकाचे लोकार्पण रवींद्र भवनाने आयोजित केलेल्या थळाव्या कोंकणी नाटय़ महोत्सवात करण्यात आले.
डॉ. सर्वानंद तुकाराम सावंत देसाई यांनी समाज कार्य विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली असून सात वेगवेगळय़ा विषयावर अभ्यास करुन त्यांच नाटय़रूपी संवादांच्या लिखाणावर हे पुस्तक आधारित आहे. कागदाचा कसा कमीतकमी उपयोग आपण करू शकतो. गोव्यातील पर्यटन स्थळावर कशा पद्धतीने आपण त्याची नोंदणी करू शकतो, मायक्रोफोन जो आम्ही कार्यक्रमात रोज वापरतो त्याचा उपयोग आपल्याला कसा आहव त्याच काम कसं चालत, रेल्वे जी आपल्याला खूप उपयोगाची आहे या संदर्भात माहिती तसंच गोव्यातील वनस्पती बद्दल व गोव्यातील विविध खात्यांची माहिती ह्या पुस्तकात नाटय़संवाद रूपात समावलेली आहे.
ह्या वेळी बोलताना प्रमुख पाहुणे कुडचडे काकोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष विश्वास सावंत देसाई ह्यानी डॉ. सर्वानंद तुकाराम सावंत देसाई ह्याच्या कामाचा आढावा घेतला व क्रांति प्रकाशनला पुस्तक प्रकाशित केल्या बद्दल शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर सावर्डेचे सरपंच संदीप प्रभू पाऊसकर ह्यानी ही ह्या पुस्तकाबद्दल विशेष उदगार काडले.
ह्या पूर्वी डॉ. सर्वानंद तुकाराम सावंत देसाई ह्यांच्या कोंकणी एकांकिकेचे पुस्तक ’सात पड्डे’ हे पुस्तक 2014 सालामध्ये प्रकाशित झालं होतं. डॉ. सर्वानंद सावंत देसाई हे एक शिक्षक असून लोककलाकार, सुत्रसंचालक, युवा संयोजक, पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यानी समाजकार्य विषयात पदवी, पदवीका, उच्च पदवी व डॉक्टरेट मिळवली असून लोकप्रशासन विषयात पदवी प्रस्थापित केली आहे. शैक्षिणिक क्षेत्रात काम करताना, विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱया साहीत्याची निर्मिती डॉ. सर्वानंद सावंत देसाई यांच्याकडून झाली आहे. त्याची अजूनही काही पुस्तके प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहेत.
यावेळी व्यासपीठावर रवींद्र भवनाचे कार्यकरणीचे सदस्य जितेंद्र खांडेकर, मयूर नाईक, सर्वानंद सावंत देसाई, मुकुंद नाईक, विट्टलदास भट, बंटी उडेलकर व रजनी भेंबरे उपस्थीत होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी उडेलकार ह्यानी केले तसेच रवींद्र भवनाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य रजनी भेंबरे ह्यानी आभार मानले.









