प्रतिनिधी / बेळगाव
विनायकनगर येथील नागरिक गोपाळ रा. खदारवाडकर यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. मूळचे बेकीनकेरे गावचे असलेले खदारवाडकर हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यांना तीन कन्या आहेत.
संजीवनी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या अवयव दान जनजागृती मोहिमेदरम्यान खदारवाडकर यांनी देहदानाचा संकल्प केला. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. नेत्र दान, त्वचादान, अवयवदान या बाबत कोणालाही माहिती हवी असेल तसेच संकल्प करावयाचा असेल तर ट्रस्टचे कार्यकर्ते संजीव देसाई यांच्याशी 9870688260 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









