बेळगाव : माहिती व प्रसिद्धी खात्याच्यावतीने सोमवार दि. 14 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत पत्रकारांसाठी ‘फॅक्ट चेक’ या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गुगल संस्थेच्यावतीने हे शिबिर होत असून, मार्गदर्शक म्हणून पत्रकार विनोद हरिकांत उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात फोटो व्हेरीफिकेशन, व्हिडिओ व्हेरीफिकेशन, वेबसाईट व्हेरीफिकेशन, जीओ लोकेशन याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छुक पत्रकारांनी दि. 11 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत माहिती व प्रसिद्धी कार्यालयात प्रत्यक्ष अथवा 9448589639 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी.









