आजपासून तालुक्मयात सह्यांची मोहीम राबविणार. आयआयटी बचाव समितीची स्थापना.
प्रतिनिधी / वाळपई
गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली येथे होणार असलेला आयआयटी प्रकल्प हा फक्त सदर पंचायत क्षेत्र पुरताच मर्यादित नाहीतर या प्रकल्पाच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयाचे भवितव्य उभे राहणार आहे. अवघ्या लोकांच्या विरोधामुळे या प्रकल्पासमोर समस्या निर्माण झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सत्तरीच्या विकासावर होणार आहे. यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी गुळेली आयआयटी बचाव समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील जनतेचे मत जाणून घेण्याच्या अनुषंगाने आजपासून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
समितीचे कार्यकर्ते प्रत्येक घरोघरी जाऊन तयार करण्यात आलेल्या आवाहन पत्राला अनुसरून जनमत जाणून घेणार आहेत. त्यानंतर जनतेचे या प्रकल्पासंदर्भात काय मत आहे हे स्पष्ट होणार आहे. या प्रकल्पाच्या संदर्भात सत्तरीतील बाहेरच्या लोकांनी ढवळाढवळ न करता सत्तरीच्या लोकांनी निर्णय घ्यावा असे आवाहन आयआयटी बचाव समितीने केले आहे.
यासंदर्भातील एक पत्रकार परिषद नुकतीच खोतोडा येथे झाली व सह्याची मोहीम आजपासून प्रारंभ करणार असल्याची घोषणा करण्यात आली. समितीचे अध्यक्ष श्याम सांगोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेत सत्तरीतील जनतेने या प्रकल्पाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
सह्यांची मोहीम आजपासून राबविणार ः श्याम सांगोडकर
या प्रकल्पाच्या माध्यमातून सत्तरीच्या शैक्षणिक विकासाला खऱया अर्थाने संधी प्राप्त होणार आहे. भागातील मूठभर लोकांच्या विरोधाला हा प्रकल्प बळी पडणार नाही याची विशेष दखल घेणार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्याम सांगोडकर यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून झाडांची कत्तल होणार असल्याची दिशाभूल करणारी माहिती स्थानिकांना देण्यात येत आहे. मात्र 80 टक्के जमीन ही पूर्णपणे खडकाळ असून उर्वरित 20 टक्के भागांमध्ये झाडे आहेत. त्यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारावरून नागरिकांनी स्वतःची दिशाभूल करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले.
गरज पडल्यास शक्तिप्रदर्शन करून दाखविणार ः अजित देसाई
चुकीची माहिती देऊन या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मूठभर लोकांना घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून होताना दिसत आहे. ही खरोखरच हास्यास्पद बाब आहे. हा प्रकल्प फक्त गुळेली पंचायत क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो सत्तरी तालुक्मयाच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे. यामुळे येणाऱया काळात गरज पडल्यास या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी असल्याचे बचाव समितीचे सचिव अजित देसाई यांनी स्पष्ट केले.
चांगल्याप्रकारचा प्रकल्प ः विशांत नाबर
हा प्रकल्प शैक्षणिक दृष्टिकोनातून मुलांना चांगल्या प्रकारची संधी देणारा आहे. यामुळे हा प्रकल्प या भागातून गेल्यास तालुक्मयात शैक्षणिकदृष्टय़ा नुकसान होणार आहे. या प्रकल्पाचे भवितव्य आता जनतेच्या हाती आहे. येणाऱया काळात राबविण्यात येणाऱया सह्यांच्या मोहिमेला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन या प्रकल्पाप्रती आपले समर्थन नागरिकांनी दाखवून द्यावे, असे आवाहन समितीचे सहसचिव विशांत नाबर यांनी केले.
सत्तरीच्या विकासाची चिंता बाहेरच्याना नको ः ओमप्रकाश बर्वे.
यासमितीचे खजिनदार ओमप्रकाश बर्वे यांनी यावेळी सत्तरी तालुक्मयाच्या विकासाची चिंता सत्तरी तालुक्मयातील बाहेरच्या जनतेने करू नये. आतापर्यंत सत्तरी तालुक्मयात अनेक समस्या निर्माण झाल्या. मात्र त्या सोडविण्याची ताकद जनतेकडे आहे. यामुळे येणाऱया काळात या प्रकल्पाचे भवितव्य जनतेच्या हाती असून यामुळे बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये, असा इशारा आवाहन बर्वे यांनी केले.
सुशिक्षित बेरोजगार मुलांचे दुःख आईवडीलांना माहिती ः आरती घोलकर
आपल्या मुलांचे भवितव्य चांगले व्हावे यासाठी आई-वडिलांची धडपड असते. महत्त्वाचे म्हणजे या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी आई वडील समस्यांना तोंड देऊन त्यांना परराज्यात पाठवीत असतात. याप्रकल्पाच्या माध्यमातून आई-वडिलांचे मुला प्रति असलेले शिक्षणाची समस्या दूर होणार आहे. त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी प्राप्त होणार आहे. यामुळे प्रकल्पाला विरोध करण्याऐवजी पाठिंबा द्या असे आवाहन केले.
गुळेली आयआयटी बचाव समिती
अध्यक्ष-श्याम सांगोडकर, उपाध्यक्ष-लक्ष्मण मेळेकर, सचिव-अजीत देसाई, सहसचिव-विशांत नाबर, खजिनदार-ओमप्रकाश बर्वे, उपखजिनदार-आत्माराम देसाई, सभासद-लवू गावकर,प्रकाश नाईक, प्रेमनाथ हजारे, फिलिप मास्कारेन्स,आरती घोलकर,दशरथ नाईक, संतोष गावडे,रोहीदास गावकर, निकास गावडे,नवनाथ उसगावकर, संदीप देसाई, विशाल नाईक, सुकडो उसपकर, उमेश कासकर, दिपक च्यारी.









