बेळगाव/प्रतिनिधी
समाजाच्या उन्नतीत बदल करीत असलेल्या निस्वार्थ समाजसेवेबद्दल कै. बसवंत नामू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था (ट्रस्ट ) यांच्यावतीने गणेश प्रभाकर रोकडे यांना आदर्श समाज भूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गणेश रोकडे यांनी आपल्या समाजसेवेत विविधतेतून एकता व ऐक्मय जोपासण्याची परंपरा रुजविली आहे. याबरोबरच त्यांनी राज्यघटनेतील समता व बंधुता ही तत्वे समानभूत मानून कार्य केले आहे. त्यामुळे या संस्थेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2020 सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.









