म. ए. युवा समितीची मागणी : विविध समस्यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन
बातमीदार / खानापूर
खानापूर येथील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्याकरिता रुग्णालयात 100 ते 125 ऑक्सिजन बेडची त्वरित व्यवस्था करण्यात यावी. तसेच कंटेन्मेंट झोन हद्दीतील सर्व रस्ते पूर्णपणे बंद केल्याने आपत्कालीन प्रसंगी अडचणी येऊ लागल्या आहेत. त्याकरिता रस्ते मोकळे करून त्या ठिकाणी देखरेकीसाठी प्रशासकीय कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात यावी, आशा मागण्यांचे निवेदन तालुका म. ए. युवा समितीच्यावतीने तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना सादर करण्यात आले. उपतहसीलदार कोलकार यांनी निवेदनाचा स्वीकार करून वरि÷ांकडे निवेदन पाठविणार असल्याचे आश्वासन दिले.
कोरोना रुग्णांवर तालुक्मयातच उपचार करा, असा आदेश नुकताच जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनांना दिला आहे. मात्र खानापूर तालुक्मयात पुरेसे ऑक्सिजन बेड नसल्याने रुग्णांची वाताहत होत आहे. अलीकडे तालुक्मयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारी रुग्णालयात 100 ते 125 बेडची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. अन्यथा पुढील काळात स्थिती आणखीणच बिकट होऊ शकते. याची दखल घेत लवकरात लवकर ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात यावी. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार खानापूर तालुक्मयातील रुमेवाडी, हलकर्णी, नंदगड, लोंढा, अशोकनगर, आंबेवाडी, शिरोली, जामगाव व देवलत्ती या गावांना खबरदारीचा उपाय म्हणून कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. मात्र यातील काही गावांची हद्दही राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. त्या हद्दीतील सर्व रस्ते बंद केले आहेत. यामुळे आपत्कालीन व्यवस्थेला अडचण येऊ शकते, त्यासाठी महामार्गावरील रस्ते खुले करावेत किंवा त्या जागी प्रशासकीय कर्मचारी नेमावा, जेणेकरून तो आपत्कालीन वेळेला रस्ता मोकळा करून देईल, अशी व्यवस्था त्वरित करावी, आशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, मारुती गुरव, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, विशाल बुवाजी आदी उपस्थित होते.









