खानापूर / प्रतिनिधी
ग्रामीण भागात इतर सुविधा देण्याबरोबरच इंटरनेट सेवा पोहचविण्यात आली आहे. मात्र खानापूर तालुक्मयातील 80 हून अधिक छोटी गावे, गवळीवाडे येथे मतदान केंदे नाहीत. त्यामुळे तेथील जनतेला दुसऱया गावात असलेल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी 7 ते 6 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. अनेक गावांतील जनेतला मतदानासाठी जाताना त्रास सहन करावा लागत असून अनेकजण मतदानाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन करणाऱया निवडणूक आयोगाने ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणीकडे लक्ष देणे आवश्यक बनले आहे.
खानापूर तालुक्मयाचा विस्तार मोठय़ा प्रमाणात असून तालुक्यात 210 महसूल गावे आहेत. तर 63 मजरे (छोटी गावे) आहेत. मात्र यापैकी अनेक दुर्गम भागात मतदान केंदे नसल्याने मतदान असून यापैकी अनेक गावाना अद्यापही मुलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत, त्यामुळे पावसाळय़ात येथील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तालुक्मयातील अनेक गावात मतदान केंद्रे नसल्याने मतदान करण्यासाठी अनेकांना पायपीट किंवा वाहनाने जावे लागते. याची दखल घेत तालुक्मयात मतदान केंद्राची संख्या वाढविणे आवश्यक आहे. आपल्या गावात मतदान केंद्र नसल्याने नागरिकांना हलगा, चिगुळे, चोर्ला, कणकुंबी, पारवाड, तलावडे, तोराळी, चापोली, कालमणी, बेटगेरी, हब्बनहट्टी, हेम्माडगा, आमटे, मोरब, ओलमणी, डोंगरगाव, तिर्थकुंडे, गुंजी, कामतगे, गणबैल, माचीगड, हलशी, हलशीवाडी, कोडगई, लोढा, कारलगा, दोड्डहोसूर, कुप्पटगिरी, नंदगड, शिवठाण, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, घोटगाळी आदी ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा लागतो.
नरसेवाडी, करजगी, बस्तवाड, करंजाळ, पडलवाडी, सडा, अनगडी, कृष्णापूर, भांबार्डा, दारोळी, खानापूरजवळील शिवाजीनगर यासह 80 हून अधिक गावात मतदान केद्रांची सुविधा नाही, यामध्ये अनेक मजरे, कमी लोकसंख्या असलेली गावे व गवळी वाडय़ांचा समावेश आहे. काही गावातील नागरिकाना 2 ते 6 किमी अंतरावरील गावात जाऊन मतदान करावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी जाताना कष्ट करावे लागतात. गेल्या अनेक वर्षापासून खानापूर तालुक्मयातील मतदान केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. मात्र तालुक्मयातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन निवडणूक आयोगाने ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
तालुक्मयातील अनेक गावे अतिशय दुर्गम भागात आहेत. तेथील जनेतला मतदान करणे सोपे व्हावे यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, आजही अनेकांना चालत मतदानासाठी जावे लागते. याची दखल घेऊन लोकप्रतिनिधीनी मतदान केंदे वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेक गावामध्ये सरकारी इमारती, शाळांसह अन्य मुलभूत सुविधा नाहीत, त्यामुळे अशा गावांमध्ये मतदान केंद्र निर्माण करण्यात अडचणी येत आहेत.
शिवाजीनगरला मतदान केंद्राची आवश्यकता
रामगुरवाडी ग्राम पंचायतीच्या वॉर्डक्रमांत 4 व वॉर्डक्रमांक 5 साठी मतदान केंद्र, बाचोळी येथे ठेवण्यात आले आहे. त्यापैकी वॉर्डक्रमांक 4 मध्ये बाचोळी व मयेकरनगरचा समावेश आहे. तर वॉर्डक्रमांक पाचमध्ये शिवाजीनगर, हिंदूनगर, गिरी प्लाट, राजा सिरॅमिक परिसरातील वसाहतीचा समावेश आहे. त्यामध्ये वॉर्ड क्रमांक चारचे मतदान केंद्र बाचोळी येथे ठेवण्यात कोणतीच अडचण नव्हती. पण वॉर्डक्रमांक पाचचे मतदान केंद्र शिवाजीनगर येथे असलेल्या शाळेत ठेवणे गरजेचे होते. आता ते मतदान केंद्र बाचोळीत ठेवल्यामुळे या वॉर्डातील मतदारांची गैरसोय होणार असून प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी वाहनांची सोय करण्यावाचून दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे या पुढे तरी ही अडचण दूर करुन शिवाजीनगर येथेच मतदान केंद्र करावे, अशी वॉर्डक्रमांक 5 मधील मतदारांची मागणी आहे.









