मागणीवर राज्यांनी दैनंदिन देखरेख ठेवावी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात खतांची टंचाई निर्माण झाली नसल्याची भूमिका केंद्र सरकारने मांडली आहे. रसायन आणि खत विषयक मंत्री मनसुख मांडविदा यांनी देशात कुठल्याही प्रकारच्या खताची कमतरता नसल्याचे म्हटले आहे. युरियाची विक्री कुठल्याही उद्योगाला करण्यापासून रोखण्याची आणि मागणीवर दैनंदिन देखरेख ठेवण्याची सूचना त्यांनी राज्यांना केली आहे.
खत विषयक मंत्र्यांनी मंगळवारी राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत देशातील खतांच्या उपलब्धतेसंबंधी व्हर्च्युअल बैठकीत आढावा घेतला आहे. या बैठकीत 18 राज्यांचे कृषिमंत्री सामील झाले. नॅनो युरिया आणि जैविक खत यासारख्या नवीन पर्यायांचा प्रचार-प्रसाराच्या शक्यता शोधण्यास त्यांनी राज्यांना सांगितले आहे.
राज्यांकडून नमूद गरजेनुसार केंद्र सरकारने वेळोवेळी खतांचा पुरवठा होईल याची दक्षता घेतली आहे. खतांचे पुरेसे उत्पादन होत असून सध्या कुठलीच टंचाई नसल्याचे मांडविया म्हणाले.
मागील काही काळादरम्यान डीएपीच्या वाढीव मागणीच्या पूर्ततेसाठी राज्यांनी केलेल्या प्रयत्नांचे मांडविया यांनी कौतुक केले आहे. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी खतांची उपलब्धता सुनिश्चित करणे केंद्र आणि राज्यांची संयुक्त जबाबदारी आहे. जिल्हा स्तरावर खतांच्या मागणीचा साप्ताहिक आढावा घेतला जेणे आवश्यक आहे. अनेक जिल्हय़ांमध्ये खतांचा गरजेपेक्षा अधिक साठा पडून राहिला असल्याचे विधान मांडविया यांनी केले आहे.









