साखर सहसंचालक कार्यालय स्वाभिमानीचे आंदोलन
प्रतिनिधी / कोल्हापूर
2017l 18 या हंगामातील थकित दोनशे रुपये परत मिळावी जबरदस्तीने केलेले ऊस करार रद्द करुन नव्याने करार करावेत स्वाभिमानीच्या ऊस परिषद झाल्याशिवाय कारखाने सुरू करणे त्याशिवाय कारखान्यांना गळाप परवाने देऊ नयेत. यासह अन्य मागण्या करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर आंदोलन केले.
समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून साखर संचालकांच्या अंगावर भिरकावले. यावेळी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला प्रादेशिक साखर सहसंचालक एन आर निकम यांनी कारखान्यांना नोटीस द्वारे सूचना करण्यात येईल असे आश्वासन दिले आंदोलनात स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील युवा आघाडीचे सागर शंभू शेटे, वैभव कांबळे, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









