मात्र खुनांच्या प्रकारात वाढ, चोऱया-घरफोडय़ा अर्ध्यावर
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात बेळगाव शहर व तालुक्मयात गुन्हेगारीचा आलेख घटला आहे. मात्र, खुनांचे प्रकार वाढल्याचे आकडेवारीवरून सामोरे आले आहे. खासकरून चोऱया, घरफोडय़ा, अपघातही घटल्याचे दिसून येते. लॉकडाऊन व हळूहळू झालेला अनलॉकच्या काळात गुन्हेगारीत घट झाली आहे.
गेल्या वर्षभरात चोऱया, घरफोडय़ा, खून, चेनस्नॅचिंग, अपघात, अपघातातील मृत्यू आदी प्रकरणांचा तपशील उपलब्ध झाला आहे. यावरून गुन्हेगारीचा आलेख घटल्याचे दिसून येते. मार्केट, खडेबाजार, शहापूर, बेळगाव ग्रामीण आदी पोलीस स्थानकात गुन्हा क्रमांक दरवषी तीनशेच्या घरात जात होता. गेल्या वषी हा आकडा 100 ते 125 च्या घरातच आहे.
गेल्या वर्षभरात खून प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येते. 2019 मध्ये खुनाचे 18 प्रकार घडले होते. त्यापैकी तीन खोटे निघाले होते. तर 15 खुनाच्या घटनांची नोंद झाली होती. 2020 मध्ये 23 खुन्याच्या घटना घडल्या असून एक प्रकरण खोटे असल्याचे आढळून आले असून 22 खून प्रकरणांची वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
2019 मध्ये खुनी हल्ल्याच्या 61 घटना घडल्या आहेत. गेल्या वषी हा आकडा 52 वर पोहोचला आहे. दरोडय़ाचे 2019 मध्ये दोन गुन्हे घडले होते. गेल्या वषी एका घटनेची नोंद झाली आहे. 2019 मध्ये चेनस्नॅचिंगच्या 9 घटना घडल्या होत्या. तर 2020 मध्ये चेनस्नॅचिंगच्या 4 घटनांची नोंद आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंतची ही आकडेवारी आहे.
2019 मध्ये 57 दिवसा व 100 रात्रीच्या घरफोडय़ा झाल्या होत्या तर गेल्या वषी ही संख्या 25 व 57 इतकी आहे. किरकोळ व भुरटय़ा चोऱयांमध्येही घट झाल्याचे दिसून येते. 2019 मध्ये 207 घटना घडल्या होत्या. 2020 मध्ये 174 भुरटय़ा चोऱयांची नोंद झाली आहे.
2019 मध्ये फसवणूक प्रकरणी 105 गुन्हय़ांची नोंद झाली होती. गेल्या वर्षी 59 एफआयआर दाखल झाले आहेत. 2019 मध्ये बेळगाव शहर व तालुक्मयात 154 अपघात घडले होते. गेल्या वषी 115 अपघातांची नोंद झाली आहे. तर हुंडय़ासाठी महिलांना छळण्याप्रकरणी 2019 मध्ये 77 गुन्हे दाखल झाले होते. गेल्या वषी 47 एफआयआर दाखल झाले आहेत.
अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रकरणात किंचित घट झाली आहे. 2019 मध्ये पोक्सो प्रकरणी 18 गुन्हे दाखल झाले होते. गेल्या वर्षी अशा 16 घटना घडल्या आहेत. एकंदर गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीत घट झाल्याचे दिसून येते.
गुन्हे कमी, तपास अधिक
यासंबंधी ‘तरुण भारत’ने कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याशी संपर्क साधला असता 2019 च्या तुलनेत गेल्या वषी गुन्हेगारीचा आलेख घटला आहे. ही गोष्ट खरी आहे. पोलिसांना गेले वर्षभर लॉकडाऊन, सीलडाऊन बरोबरच कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी एखाद्या योद्धय़ांसारखे काम करावे लागले. अशा परिस्थितीतही अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्यात आला आहे. खास करून चोऱया, घरफोडय़ा प्रकरणात मोठय़ा प्रमाणात मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









