सोडविले सर्वात अवघड गणित
हत्येप्रकरणी 25 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने केलेली कामगिरी भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. या कैद्याने प्राचीन गणितातील एक अवघड प्रश्नाची सोडवणूक केली आहे. या प्रश्नाचे उत्तर अनेकांना हयात घालवूनही मिळविता आले नव्हते.
शिक्षा भोगत असलेला मारेकली क्रिस्टोफर हेवन्सने हायस्कुलचे शिक्षणही पूर्ण केलेले नव्हते. तरीही त्याची गुणवत्ता पाहून लोक थक्क झाले आहेत. क्रिस्टोफरने तुरुंगात असतानाच गणितात प्राविण्य मिळविले होते.
तुरुंगात कैद्यांकडे अनेकदा पुनर्शिक्षणासाठी पुस्तके पोहोचविली जातात, जेणेकरून तो शिकून योग्य मार्गावर परतावा. अशाच एका पुढाकारामुळे क्रिस्टोफर गणितात तरबेज झाला आहे. हेवन्सने गणित विषयातील एक प्राचीन प्रश्नावरील उत्तर मिळविले आहे.
क्रिस्टोफरने स्वतःचे शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. नोकरी न मिळाल्याने तो अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. हत्येच्या एका प्रकरणात दोषी ठरल्यावर तो मागील 9 वर्षांपासून तुरुंगात आहे. तुरुंगात असताना क्रिस्टोफरने गणिताबद्दल मनात स्वारस्य निर्माण केले. त्याला नवनवी पुस्तके वाचण्याची अनुमती आहे, पण याकरता त्याला अन्य कैद्यांना शिकवावे लागते.
हेवन्सने ‘एनल्स ऑफ मॅथेमॅटिक्स’च्या काही मुद्दय़ांसाठी तुरुंगातून एका गणित प्रकाशकाला हस्तलिखित पत्र पाठविले होते. मॅथमॅटिका सायन्स पब्लिशरच्या संपादकाने स्वतःच्या एका सहकाऱयाला हे पत्र पाठविले होते. त्यांनी ते पत्र टय़ूरिनच्या अम्बर्टो सेरुतीमधील गणिताच्या प्राध्यापकाला दिले होते. त्यांनी हेवन्सच्या क्षमतेचे परीक्षण करण्यासाठी एक अत्यंत अवघड प्रश्न त्याला दिला होता. अम्बर्टो यांना पोस्टाद्वारे अचूक उत्तर मिळाले होते.









