प्रतिनिधी / टोप :
नृसिंह सरस्वती दत्तमहाराज यांच्या करुणा पादुकाच्या सानिध्यात होणारा “कृपासिंधु स्वामीचा नामस्मरण सोहळा” टोप येथील शाहू विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरणात हजारो स्वामी भक्ताच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा सोहळा सद्गुरू स्वामी शंकर भजनी मंडळ टोप यांच्या विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता. कोल्हापुर जिल्हयात नामस्मरण सोहळा कार्यक्रम प्रथमच पार पडला. करवीर महात्म्य या ग्रंथात सोळाव्या अध्यायात टोप मधील श्री.कल्लेश्र्वर तसेच विष कुंड व गुप्त गंगा असल्याचा उल्लेख असल्याने या भु कैलासाच्या पावनभूमीत हा सोहळा संपन्न झाला .
या सोहळ्यासाठी ३०फुट उंचीचि गजारुढ प्रतिकृती व त्यावर श्री. स्वामी समर्थांची मूर्ती व या प्रतिकृतीच्या छायेखाली विराजमान कडंगची ता. आळंद जि.गुलबर्गा येथील श्रीं च्या पवित्र पादुकाचे पुजन कडंगची दत्त देवस्थान संस्थानचे अध्यक्ष शिवशरण आप्पा मादगड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेखा अनिल पाटील व अनिल महादेव पाटिल यांच्या हस्ते पुजा झाली. पौराहित्य श्रीधर कुलहळ्ळि श्रेयस माणगांवकर यांनी केले. प्रसाद पुजारी यांनी श्री गुरु महाराजांच्या नामस्मरणाचे महत्व सांगुन कलियुगात सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. यावेऴी हजारो स्वामी भक्तांनी दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा व श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चे नामस्मरण केले. भक्तिमय वातावरणात सर्व भाविकांनी दर्शन घेतले. या सोहळ्याला वेदातिका धैर्यशील माने, लोकनियुक्त सरपंच रुपाली तावडे या प्रमुख उपस्थित होत्या. महिला भक्तांचा सहभाग देखील मोठया प्रमाणात होता. टोप पंचक्रोशीसह कोल्हापूर जिल्हातील विविध ठिकाणाहून हजारो भक्तगणानी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती.
हा सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रसाद पुजारी, अनिल पाटील, डॉ. सचिन करमुसे, अमित पाटील, विजय इंगवले, भिकाजी मिसाळ, अभिजित पोवार, सुरज पोवार, प्रकाश पाटील, परशुराम नलवडे, रोहित चौगुले, नामदेव सुतार, वैभव चौगुले, सौरभ पोवार, संग्राम पाटील, गुरुराज पाटील, प्रसाद ढवाळे, सागर भोसले, स्वप्निल भोसले यांच्यासह स्वामी भक्त यांऩी परिश्रम घेतले.









