संतत्प वाहनचालकांची मागणी : आयडीसीच्या व्यवस्थापकांना रस्त्यावरच घेराव
प्रतिनिधी /फोंडा
पुंडई औद्योगिक वसाहत परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या दुर्दशेविषयी दुचाकीचालक आक्रमक बनले असून येत्या पंधरा दिवसात रस्त्याची डागडुजी न केल्यास औद्योगिक परिसरातील रस्ता रोको करणार असल्याचा ईशारा संतप्त वाहनचालकांनी दिला आहे. कामगार व वाहनचालकांनी रस्त्यावरच आयडीसी व्यवस्थापकाला घेराव घातल्याने पोलिसांना पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण आणवे लागले तसेच तोंडी आश्वासनानंतर संतत्प वाहनचालकांनी शांत झाले.
यावेळी बोलताना आयडीसीचे व्यवस्थापक मुपुंद कायसुवकर यांनी निवडणूक आचासंहितेमुळे रस्त्याच्या डागडुजीचे काम रखडल्याची माहिती दिले. कंपनी युनिटकडून भाडेपट्टीच्या रूपातील निधी सुमारे रू. 3 कोटी थकबाकी असल्याची माहिती देण्यात आली. आचारसंहिता शिथील झाल्यानंतर महिन्याभरात रस्त्याची डागडुजी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. कुंडई औद्योगिक वसाहतीत सुमारे 380 छोटया मोठय़ा आस्थापने असून केवळ सहा कुंडई वसाहतीतल इन आऊट गेट ते मेडी स्प्रे कंपनीपर्यत रस्त्याची पुर्णतः वाताहत झालेली दिसून येत आहे. मागील सहा वर्षापासून येथे उदारनिर्वाहासाठी गोव्याच्या कानाकोपऱयातून येणारे वाहनचालक खड्डेमय रस्त्यातून वाट काढीत त्रास सहन करीत आहे. मात्र कोणत्याच सरकारी यंत्रणेचे यावर लक्ष नसल्याचे दिसून येते.
कुंडई येथील कॅडीला कंपनीजवळ रस्ता पुर्णतः कायम उखडलेला
कुंडई येथील जायडस् कॅडीला कंपनीजवळील रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेला आहे. पावसाळय़ातील पाणी थेट रस्त्यावर साचत असल्याने येथे रस्ता खचत आहे. गटार तुंबलेली असून काही समोरील कंपनीचे गटारही अरूंद झाल्याने अशी परिस्थिती उद्भवत असल्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. यावर कोणत्याच सरकारी यंत्रणेचे लक्ष राहिलेले नाही. एखादा मोठी दुर्घटना घडल्यानंतर सरकारला जाग येईल का असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित पेलेला आहे.
सहा वर्षापुर्वी रस्त्याचे हॉटमिक्सींग करण्यात आले होते. त्यानंतर या रस्ताकडे कोणीच डूंकुनही बघितलेले नाही प्रत्येक पावसाळय़ात रस्त्यावर डबक्याचे स्वरूप प्राप्त होत असून खड्डे चुकवून वाट काढावी लागत प्रवास करावा लागत आहे. सीएसआर फंडातून रस्ता उभारणीसाठी प्रयत्न व्हावे. हॉटमिक्सिंगची कामाची पाहणी करून निविदा काढण्यात आलेला आहे. मात्र येत्या दिवसात कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती कायसुवकर यांनी दिली.









