जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था
आघाडी लाईनअपमधील फलंदाज कीगन पीटरसनला कोरोनाची बाधा झाली असून यामुळे तो न्यूझीलंड दौऱयात सहभागी होऊ शकणार नसल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने जाहीर केले. त्याच्याऐवजी सिक्स-गन ग्रिल वेस्टर्न प्रोव्हिन्सचा युवा फलंदाज झुबेर हमझा याचा द. आफ्रिकन संघात समावेश करण्यात आला. पीटरसन यापूर्वी भारताविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सातत्यपूर्ण योगदानाच्या बळावर मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्या मालिकेत त्याने 46.00 च्या सरासरीने 276 धावांचे योगदान दिले. मालिकेत 3 अर्धशतके झळकावणारा तो एकमेव खेळाडूही ठरला. त्याने या 3 अर्धशतकी डावात अनुक्रमे 72, 82 व 62 धावांचे योगदान दिले होते.
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी द. आफ्रिकन संघ ः डीन एल्गार (कर्णधार), तेम्बा बवूमा, सॅरेल इर्वी, झुबेर हमझा, सिमॉन हार्मर, मार्को जान्सन, केशव महाराज, एडन मॅरक्रम, वियान मल्डर, लुंगी एन्गिडी, डय़ुआन ऑलिव्हिएर, कॅगिसो रबाडा, रियान रिकेल्टन, लुथो सिपम्ला, ग्लेन्टॉन स्टूरमन, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, काईल व्हेरेन.









