प्रतिनिधी / खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरूवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात हॉटेल अनुसयानजीक झालेल्या विचित्र अपघातात ट्रकचालक जखमी झाला.
ट्रकचालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून तो चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक हळूहळू पुढे सरकत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने ट्रककडे धाव घेतली. रस्ता ओलांडत असतानाच समोरून कार आल्याने तो गडबडला. या विचित्र अपघातात त्याचा पाय त्याच्याच ट्रकच्या खाली जर्नि गंभीर दुखापत झाली. अपघाताचे वृत्त कळताच कशेडी येथील वाहतूक पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमी चालकास कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.









