ऑनलाईन टीम / बीजिंग :
अरुणाचल प्रदेशातील भारतीय सीमेजवळ असलेल्या तिबेटजवळील रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. चीनने ल्हासा आणि नायींगशी शहरांना जोडण्यासाठी हा रेल्वेमार्ग तयार केला असून, हा मार्ग भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

हा नवीन रेल्वे मार्ग शिचुआनची राजधानी चेंगदुपासून याहयान-छामदोमार्गे तिबेटपर्यंत येतो. त्यामुळे चेंगदु आणि ल्हासा या दोन मुख्य शहरांमधील अंतर तब्बल 35 तासांनी कमी होणार आहे. नायींगशी म्हणजेच लिंझीपर्यंत हा रेल्वेमार्ग जातो.
सन 2014 साली तिबेटची राजधानी ल्हासा आणि पूर्व तिबेटमधील लिंझीला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाचे काम गुरुवारी पूर्ण झाले.









