बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंचलिंग दर्शन महोत्सव सर्व सावधगिरी बाळगून साजरा केला जाईल, असे म्हंटले आहे.
सहसा हजारो भाविक हजारो भाविक या पंचलिंग दर्शनाला येतात. पंचलिंग दर्शनाचे आयोजन १४ डिसेंबर रोजी होणार आहे.
पाचलिंग दर्शनामध्ये एकाच दिवशी ताळकडू आणि त्याच्या आसपास स्थित पाच प्रमुख शिव मंदिरांना भेट दिली जाते. शेवटचा पंचलिंग दर्शनाचा महोत्सव २०१३ मध्ये झाला होता.









