चुये / प्रतिनिधी
करवीर पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी पालक मंत्री सतेज पाटील गटाच्या समर्थक राष्ट्रीय काँग्रेसच्या मंगल आनंदराव पाटील (नेर्ली )यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी करवीरच्या तहसीलदार शितल मुळे – भामरे होत्या.
करवीर पंचायत समिती वरती पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे. सभापतिपद पालकमंत्री सतेज पाटील गटाकडे तर उपसभापती पद आमदार पी एन पाटील गटाकडे आहे. सभागृहातील शेवटच्या वर्षातील पहिला टर्म सभापती मीनाक्षी पाटील यांना मिळाला . नेत्यांचा आदेशाप्रमाणे कार्यकाल संपल्या. नंतर त्यांनी राजीनामा दिला त्यामुळेहे पद रिक्त होते.
गुरुवारी सकाळी अकरा वाजता सभापतीपदासाठी नेरली तालुका करवीर येथील मंगल आनंदराव पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यानंतर दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शितल मुळे भामरे यांचे अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक झाली त्यामध्ये सभापतीपदासाठी मंगल आनंदराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनीसमितीच्या आवारात जल्लोश केला .
यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयवंत उगले उपसभापती अविनाश पाटील प्रमुख उपस्थित होते .
नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविणार ..
पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्यामुळे मला सभापती पदाची संधी मिळालेली आहे. त्यामुळे करवीर च्या विकासासाठी विशेष प्रयत्न करून नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याची भावना नूतन सभापती मंगल पाटील यांनी व्यक्त केली.









