प्रतिनिधी /वास्को
मुंडवेल वाडे वास्को येथील श्री ओवळेश्वर गोपाळकृष्ण संस्थानचा गोकुळाअष्टमी उत्सव दि. 30 व 31 ऑगस्ट रोजी यंदा कोरोना संक्रमणामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
आज सोमवार दि. 30 रोजी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सायंकाळी 6 वा. सामुहीक अभिषेक, रात्री 8 वा. स्थानिक भजनी कलाकारांतर्फे भजन, 10 वा. आरती व तीर्थप्रसाद. मंगळवार दि. 31 रोजी गोपाळकाला दिनी सायंकाळी सार्वजनिक पालखी उत्सव होणार नाही. यंदा पालखी मंदिरात ठेवण्यात येईल. रात्री आरती व तीर्थप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल.









