तुर्कस्तानने नोंदविला तीव्र आक्षेप
वृत्तसंस्था/ व्हिएन्ना
युरोपमधील ऑस्ट्रियामध्ये ‘इस्लामिक नकाशा’ प्रसिद्ध करण्यात आल्याने मुस्लीम समाजात नाराजी आहे. तेथील एका मुस्लीम समुहाने ऑस्ट्रिया सरकराचे प्रमुख चॅन्सेलर सेबेस्टियन क्रूज यांच्यावर वादग्रस्त नकाशाचे अनावरण केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. मुस्लीम यूथ ऑस्ट्रिया या समुहाने ‘इस्लमिक नकाशा’ प्रसारित केल्याप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. या नकाशात देशातील मशिदी आणि मुस्लीम संघटनांच्या ठिकाणांना दर्शविण्यात आले आहे.
ऑस्ट्रियातील इंटीग्रेशन मिनिस्टर सुसैन राब यांनी ‘नॅशनल मॅफ ऑफ इस्लाम’ या नावाने एक संकेतस्थळ सादर केले आहे. यात 620 हून अधिक नावे आणि पत्ते नमूद आहेत, ज्यात मशिदी, संघटना आणि त्यांचे पदाधिकारी सामील आहेत. तसेच यात त्यांच्या विदेशातील संभाव्य संपर्क देखील सामील आहे.
नकाशामुळे चॅन्सेलर कुर्ज याहंच्या कॉन्झरर्वेटिव्ह ऑस्ट्रियन पीपल्स पार्टी आणि सहकारी ग्रीन पार्टीमधील तणाव वाढला आहे. अशाप्रकारचे पाऊल वंशद्वेष वाढविणारे आहे, तसेच मुस्लीम नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण करणारे असल्याचे द ग्रूप इस्लामिक रिलिजियस कम्युनिटीने म्हटले आहे. तर इंटीग्रेशन मंत्री राब यांनी ‘मुस्लिमांना संशयाच्या कक्षेत ठेवणे’ हा यामागील उद्देश नव्हता असे स्पष्टीकरण दिले आहे.









