नवी दिल्ली
जर्मनीमधील लक्झरी कार निर्माती कंपनी ऑडीने भारत सरकारकडे आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली आहे. भारतात आयात होणाऱया कार्सवर अधिकचा कर लावला जात असल्याबाबत ऑडी या कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे. इलेक्ट्रिक कारवर कंपनीचा जोर असणार असून त्याबाबत मत मांडताना आयात शुल्कात कपातीची मागणी कंपनीने केली आहे. कपात केली गेल्यास स्थानिक स्तरावर उत्पादन घेणे सोयीचे होणार असल्याचे ऑडीने म्हटले आहे.









