आता किमान वर्षभर तरी जगाला कोरोनासोबत नांदावे लागणार असल्याचे तज्ञ सांगतात. महाराष्ट्राचा पर्यायाने मुंबईतून लढला जाणारा कोरोनाविरोधातील लढा जगासमोर आदर्शवत ठरेल, असाच आहे.
मुंबईच्या पेंद्रस्थानी असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या विमानतळाशी अगदी झोपडपट्टीत राहणाऱया मुंबईकरांपासून ते उच्चभ्रू मुंबईकरांचा असणारा रोजचा संबंध फोफावणाऱया कोरोना संसर्गाशी गडदपणा अधिक विषद करतो. येथील लोकसंख्या घनता, मनमौजी जीवनशैली, आरोग्यसेवेतील मर्यादा या संसर्गाच्या मुळाशी आहेत. कोरोना संसर्गानंतर पाळले न जाणारे नियम यात भर घालणारे आहेत. तरिही आज येथील कोरोना मफत्यूदर तुलनेने कमीच आहे. ही दिलासादायी बाब आहे. याचाच अर्थ मुंबईकरांचा हा लढा जगासमोर नक्कीच आदर्शवत ठरणारा आहे. रविवारी 17 मे रोजी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 2347 एवढी होती. ही संख्या 24 तासातील होती. गेले आठवडाभर हजारोच्या संख्येत रुग्ण वाढत आहेत. वाढणारी रुग्णसंख्या भीतीदायक वाटत असली तरी संसर्गित रुग्ण समोर येत असल्याने रुग्णांची ओळख होत आहे. कोणत्याही जीवघेण्या साथरोगात रुग्ण ओळख होणे महत्वाचे असते. एकदम एकावेळी रुग्ण संख्या उफाळून आल्याची दिसल्याने काळजी वाटत आहे. मात्र, याची दुसरी बाजू अशी की चाचण्या वाढवण्याने रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे पुढील उपचार वेळेत होण्यास मदत होईल व रुग्णाचा जीव वाचेल. याच्या अगदी उलट स्थिती एप्रिलच्या मध्यापर्यंत होती. त्यावेळी रुग्णसंख्या मर्यादित होती. 22 मार्च नंतरच्या पंधरवडय़ात कोरोनाच्या संसर्गाबाबत कोणीच गंभीर नव्हते. गंभीर संसर्ग लक्षात घेऊनच सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात येत आला. जास्तीत जास्त तीन टप्प्यात संसर्गाचीही साखळी खंडित होईल, असा एक कयास होता. लॉकडाऊनमध्ये लोक गंभीरपणे सहभागी होतील, असे राज्य सरकार गफहित धरून चालत असल्याने बरीचशी फसगत झाली. याच दरम्यान लॉकडाऊन कसे चाललय, कोरोना साथ नाही, बाजारहाट करण्यास लोक सहज रस्त्यावर उतरत होते. महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलोय असे सांगून बाईक घेऊन रपेट मारणारे रस्त्यावर अधिक आढळून आले. आता लॉकडाऊन वाढू लागल्यावर संसर्ग वाढत असल्याचा आरोप करत आहे. वैद्यकीय क्षेत्र आणि आरोग्य विभाग त्यांच्या जागी नेमस्त काम करत आहेत. देशात महाराष्ट्र त्यातही मुंबई रुग्ण नोंदीत आघाडीवर आहेत. येथील घनता आणि लोकसंख्या याचा विचार करता काही भाग वगळता समूह संसर्ग नसल्याचे सरकारी यंत्रणा सांगते.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात रुग्ण संख्या लपवत असल्याची शंका उपस्थित केली जात होती. कारण काही तज्ञांचे अंदाज राज्यात लाखावर संख्या जाण्याचा अंदाज व्यक्त होत होते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था व मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातच कोरोना विशेष तपासणी अहवाल तपासले जात होते. त्यानंतर अन्य खासगी लॅबना तपासणी परवानगी दिल्याने चाचण्या अधिक होऊ लागल्या आहेत. मागच्या रविवारी एका दिवसात राज्यात 2347 बाधितांची संख्या आढळली. मात्र, त्याच रविवारपर्यंत नमूने तपासण्याची राज्यातील संख्या 2 लाख 73 हजार एवढी होती. याचा अर्थ चाचण्या मोठय़ा प्रमाणात केल्या जात आहेत. सुमारे पावणे तीन लाख नमुन्यातील 2 लाख 40 हजार 186 नमुने निगेटिव्ह असल्याची बाब सकारात्मकता दर्शवते. मार्च महिन्यातील नमुने तपासणीचे दैनंदिन प्रमाण 679 एवढे कमी होते. तेच प्रमाण मे महिन्यात 8 हजार 628 एवढे अधिकने वाढले. ही सकारात्मक बाब बाधित वाढीच्या संख्येसह सर्वांसमोर येणे आवश्यक आहे. मात्र ही संख्या वाचली जात नाही. याचा परिणाम म्हणून बाधितांचाच अधिक आकडा दिसत आहे.
कोरोना रुग्ण डिस्चार्ज करण्याची पॉलिसी बदलली आहे. सुरुवातीला सरसकट 14 दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन केले जात होते. नंतर घरी आल्यावरही होम क्वारंटाईन सुचवले जात असे. मात्र, मे महिन्यात डिस्चार्ज पॉलिसी बदलण्यात आली. पूर्वी 14 दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाईननंतर डिस्चार्ज करताना रुग्णाचा दोन वेळा स्वाब निगेटीव्ह आल्यावर सोडले जात होते. यावेळी एक ध्यानात आले की ते दोन्ही स्वाब निगेटीव्हच येत असत. त्यामुळे नव्या पॉलिसीनुसार डिस्चार्ज निकष बदलले आहेत. नव्या पॉलिसीनुसार रुग्ण पॉझिटिव्ह आहे पण लक्षण नाहीत असे असल्यासही डिस्चार्ज देवून निरीक्षणाखाली ठेवले जात आहेत. यामुळे अधिकाधिक रुग्णांची काळजी घेणे शक्य होत आहे. तसेच रुग्ण ट्रेसिंगची पद्धती बदलण्यात आली असून नवीन पद्धतीप्रमाणे मुख्य संसर्गित रुग्ण त्याच्या थेट संपर्कातील लोक, तसेच त्या थेट संपर्कांतील संपर्क अशी तिसरी साखळी देखील निरीक्षणाखाली आणली जात आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून अधिकाधिक रुग्ण सापडत आहेत. असे करताना राज्यात कंन्टेमेंट झोन ची देखील वाढ होत आहे. रविवारी राज्यात 1688 कंटेनमेंट झोन होते. कंन्टेमेंट झोनची संख्या ही वाढती आहेत. या कंन्टेमेंट झोन मधील 63. 83 लाख लोकांचे तपासणीसाठी सर्वेक्षण करण्यात आले. ट्रेसिंगमधून रुग्ण संख्या वाढणार याचा अंदाज असल्याने मुंबईतील कोव्हीड केअर सेंटरची संख्या देखील वाढवण्यात आले आहे. खुले मैदाने कोव्हीड केअर सेंटर साठी ताब्यात घेतली जात आहेत. गोरेगाव येथील नेस्को मैदान , बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान आणि अन्य मोठय़ा आकाराच्या मैदानाचा विचार केला जात आहे. या मैदानांची क्षमताच 600 ते 100 खाटा एवढी आहे. अशा लाखभर खाटांचा विचार सध्या केला जात आहे.
प्रत्येक आपत्तीत मुंबई लढली आहे. सध्या मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या क्रिकेटच्या स्कोअर प्रमाणे वेळोवेळी तपासली जात आहे. त्या बदलणाऱया रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी उपचार पद्धतीही वेळोवेळी बदलली जात आहे. रुग्णसंख्या व मफत्यू वाढते असले तरिही मुंबईकरांकडून दिला जाणारा आशादायी ललढा देखील उल्लेखनीय आहे. किमान वर्षभर तरी जगाला कोरेना सोबत नांदावे लागणार असल्याचे तज्ञ सांगतात.
राम खांदारे








