प्रतिनिधी /पणजी
फोंडाचे माजी नगरसेवक आर्विन सुवारीस यांच्यासह कुर्टीचे माजी पंचसदस्य नारायण नाईक यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पणजीत काँग्रेस कार्यालयात झालेल्या सोहळ्यास वरि÷ निरीक्षक पी. चिदंबरम, प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, फोंडय़ाचे उमेदवार राजेश वेरेकर, गटाध्यक्ष जॉन पॅरेरा, ट्रिबोलो सौझा आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे ज्ये÷ नेते असूनही काँग्रेसच्या माजी नेतृत्वाने सुवारीस यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ते इतर पक्षांसोबत राहिले. आज ते आमच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता पुढे नेण्यास आणि पक्ष वाढीस मदत करण्यासाठी पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत.’’ असे वेरेकर म्हणाले.
पी चिदंबरम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने माझा सन्मान झाल्या सारखे वाटले, असे सुवारीस म्हणाले. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी प्रवेश केला असून वेरेकर विधानसभा निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपला पराभूत करण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
गोवा मुक्तीनंतर आम्ही ओपिनियन पोलचा सामना केला. आज ओपिनियन पोलसारखीच स्थिती आहे. त्यामुळे आपल्यात फूट पाडू पाहणाऱयांच्या विरोधात आपल्याला लढावे लागेल,‘ असे सुवारीस यांनी सांगितले.
यावेळी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच गोव्यातील जातीय सलोख्याचे रक्षण केले असून यापुढेही सर्व समाजाचे रक्षण करणार आहे. आम्ही इतर मतदारसंघासह फोंडय़ातील जागाही जिंकणार आणि स्थिर सरकार स्थापन करणार, असे चोडणकर म्हणाले.









