बेळगाव : एसकेई संस्थेचे आरपीडी महाविद्यालय व देशपांडे फौंडेशन हुबळी यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराला अनुसरून दि. 4 रोजी कॉलेजमध्ये देशपांडे फौंडेशनतर्फे रोजगार संधी, व्यवसाय उपलब्धता या विषयावर कार्यशाळा झाली. फौंडेशनचे व्यवस्थापक बसवराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाज व व्यवसाय यामध्ये रोजगाराच्या किती संधी उपलब्ध आहेत, याची माहिती देऊन फौंडेशन कृषी, तंत्रज्ञान, कौशल्य या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत, असे बसवराज यांनी सांगितले. तसेच स्लाईड शोद्वारे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधीबद्दल माहिती दिली. प्रारंभी विद्यार्थी प्रतिनिधी अमिना शेख यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन आयक्मयुएसीचे समन्वयक डॉ. अभय पाटील यांनी केले. याप्रसंगी संचालिका लत्ता कित्तूर, प्राचार्या डॉ. अचला देसाई, प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजेंद्र पोवार, प्रा. विजयकुमार पाटील, डॉ. एस. एच. पाटील, डॉ. सी. ए. मुन्नोळी, शारीरिक प्रशिक्षक एन. रामकृष्णन, बीबीएचे समन्वयक प्रा. सविनय शिमनगौडर, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Articleरामतीर्थनगर येथील मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन
Next Article बेळगुंदी भागातील बससेवा सुरळीत करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









