मुंबई
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कोरोनाचे प्रमाण भारतात वाढल्यावर घरातूनच काम करण्याची मुभा आपल्या कर्मचाऱयांना दिली होती. सध्याही आयटी क्षेत्रातील 90 टक्के कर्मचारी घरातूनच काम करत असल्याची माहिती प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी दिली आहे. बेंगळूर चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी वरील माहिती दिली. कोरोनाकाळात लॉकडाऊननंतर पहिल्या काही आठवडय़ांमध्ये आयटी उद्योगातील 90 टक्के कर्मचारी घरातूनच काम करायचे. आजही पाहता 90 टक्केपेक्षा अधिक कर्मचारी घरातूनच काम करत असल्याचे प्रेमजी यांनी सांगितले.









