नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी आयओसी (इंडियन ऑईल कॉर्पोरेशन) येणाऱया काळात शहरांतर्गत गॅस वितरण कार्यासाठी 7 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे समजते. अलीकडेच शहरातील गॅस वितरणासाठी कंपनीने बोली लावली होती. याअंतर्गत आयओसीला वाहनांसाठीच्या सीएनजी आणि घरांसाठीच्या स्वयंपाक गॅससाठीच्या पाईपलाईनसाठीचे कंत्राट प्राप्त झाले आहे.









