डिचोली कार्यालयाबाहेर वाढदिवस साजरा. सभापती, संघटनमंत्री प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती.
डिचोली/प्रतिनिधी
मयेचे लोकप्रिय आमदार तथा गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांटय़ यांच्यावर वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव झाला. डिचोली येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर विशेष उभारण्यात आलेल्या मंडपात झांटय़? यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सभापती राजेश पाटणेकर, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, मये म?डळ समिती अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेचे प्रभारी प्रेमानंद म्हांबरे, माजी जि. पंचायत सदस्या अंकीता नावेलकर, मये मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य व मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
प्रवीण झांटय़ हे एक साधे आणि समाजसेवी व्यक्तमत्व असून त्यांना आपल्या मोठेपणावर कधीच गर्व नाही. सदैव लोकांसाठी उपलब्ध राहून काम करताना त्यांनी मयज मतदारसंघात विकासाची अनेक कामे पूर्ण केली आहेत. तसेच अनेक कामे यापुढे होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यतही त्यांनी आपल्या कामांचा धडाका चालूच ठेवावा असे यावेळी सभापती राजेश पाटणेकर यांनी म्हटले.
मये मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी झटणारे नेते म्हणजे आमदार प्रवीण झांटय़ असून त्यांच्या नेतृत्वाखाली मयेचा विकास उत्कृष्टपणे चालू आहे. तसेच पक्षाचे कामही त्यांनी योग्यरीत्या सुरू ठेवलेले आहे, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी म्हटले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार झांटय़? यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित संघटनमंत्री सतीश धोंड यांनीही झांटय़ यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मोठय़ा संख्येने उपस्थित कार्यकर्ते, हितचिंतकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.









