पणजी, फोंडा, मडकई, पेडणे, शिवोलीतील उमेदवारांची घोषणा
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पक्षाने काल बुधवारी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात पणजी, फोंडा, मडकई, पेडणे आणि शिवोली या मतदारसंघांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये पणजी मतदारसंघातून वाल्मिकी नायक, फोंडय़ातून ऍड. सुरेल तिळवे, मडकईसाठी गुरुदास नाईक, पेडणेतून पुंडलिक धारगळकर आणि शिवोली मतदारसंघातून विष्णू नाईक हे आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर आपले भविष्य आजमावणार आहेत.
दिल्लीच्या आमदार आणि आम आदमी पार्टीचे गोवा डेस्क प्रभारी आतिशी यांनी ट्विट करून ही उमेदवार यादी जाहीर केली आहे. ‘येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱया गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करताना आनंद होत असून गोव्यात राजकीय बदल घडवून आणण्यासाठी आम आदमी पक्ष सज्ज झाला आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.
पाच उमेदवार व त्यांचे मतदारसंघ
- 1) वाल्मिकी नाईक – पणजी
- 2) सुरेल तिळवे – फोंडा
- 3) गुरुदास येशू नाईक – मडकई
- 4) पुंडलिक धारगळकर – पेडणे
- 5) विष्णू नाईक – शिवोली









