वृत्तसंस्था/ फिस्केबॅक्सकिल
स्वीडनमध्ये सुरू असलेल्या डिड्रिकसन्स स्केफो खुल्या गोल्फ स्पर्धेत सहभागी झालेली भारताची महिला गोल्फपटू आदिती अशोकने दुसऱया फेरीअखेर संयुक्त सातवे स्थान मिळविले आहे.
या स्पर्धेत 23 वर्षीय आदितीने पहिल्या फेरीत 72 गुण नोंदविले होते. त्यानंतर दुसऱया फेरीत तिने 5-अंडर 64 गुण घेत संयुक्त सातवे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत भारताच्या वाणी कपूरने दुसऱया फेरीअखेर संयुक्त अठरावे स्थान मिळविले आहे. फ्रान्सच्या पॉलेनी रूसिनने 60 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे.









