प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे झालेल्या 11 वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत 8 वर्षाच्या झिदान मंगाने तब्बल 14 चौकारांसह 95 धावा ठोकल्य़ा झिदान याचे केवळ 5 धावांनी शकत हुकले असले तरी रत्नागिरीच्या इतिहासात त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आह़े
छोटू देसाई क्रिकेट ऍपॅडमी यांच्यावतीने 11 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े झिदान हा छोटू देसाई ऍपॅडमी येथे प्रशिक्षण घेत आह़े मुंबई तसेच पुणे येथून प्रशिक्षणासाठी येणाऱया नामवंत रणजिपटूनी देखील झिदान याच्या खेळाचे कौतुक केल़े रत्नागिरीमधील प्रशिक्षक वृंदावन पवार, रणधीर सावंत, अभिषेक कीर, तुषार कदम हे झिदान याच्यावर मेहनत घेत आहेत़









