बेळगाव / प्रतिनिधी
हेस्कॉमतर्फे दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 7 रोजी सकाळी 10 ते 6 यावेळेत सदाशिवनगर उपकेंद्रातील हनुमाननगर स्टेज 1, 2, 3, 4, कुवेंपूनगर मॉर्डन को-ऑपरेटिव्ह सोसायटी (बसवेश्वरनगर), टी. व्ही सेंटर, कुमारस्वामी लेआऊट, बॉक्साईट रोड, सह्याद्रीनगर, जयनगर, विजयनगर, पाईप लाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मी टेक, विनायकनगर, हिंडलगा, गणपती देवस्थान, महाबळेश्वरनगर आदी भागातील विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे हेस्कॉममार्फत कळविण्यात आले आहे.









