प्रतिनिधी / काणकोण
आगोंद पंचायत क्षेत्रामधील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते फॅनी मिरांडा आणि स्टिवी फर्नांडिस यांनी 50 कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करून काणकोणातील काँग्रेस पक्षाला एक धक्का दिला आहे. श्रीस्थळ पंचायत सभागृहात नुकत्याच झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत या कार्यकर्त्यांनी भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश केला. यावेळी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, पक्षाचे काणकोण मतदारसंघाचे प्रभारी संजय सातार्डेकर, शाणू वेळीप, काणकोण भाजप मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, सरचिटणीस दिवाकर पागी, दक्षिण गोवा भाजप उपाध्यक्ष महेश नाईक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









